सागरमाला प्रकल्पात गुंतवणूक वाढणार

चेन्नई -देशातील प्रमुख 12 बंदरातून मिळणारा नफा चालू वर्षात 7 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. 2014 मध्ये हा नफा 3 हजार कोटी रुपये होता, अशी माहिती वाहतूक आणि जहाज उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. चालू वर्षात त्यात दमदार वाढ होत 7 हजार कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.

रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी बंदरांची भूमिका महत्त्वाची आहे. आयआयटी मद्रासच्या सहकार्याने नॅशनल टेक्‍नोलॉजी सेन्टर फॉर फोर्ट, वॉटरवेज ऍण्ड कोस्ट्‌स या संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमावेळी ते बोलत होते. सागरमाला प्रकल्पांतर्गत पायाभूत क्षेत्रात 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)