“सागरमाथा’च्या शिलेदारांनी जपली सामाजिक बांधिलकी

पिंपरी – दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवेच्या स्मृतींना अभिवादन करत भोसरी येथील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासली. संस्थेच्या शिलेदारांनी रमेश स्मृती सामाजिक पुनुरूत्थान उपक्रमांतर्गत जुन्नर तालुक्‍यातील किल्ले निमगिरी येथे श्रमदान, जनजागृती, वृक्षारोपण, ग्रंथिंदडी, अभ्यासपूर्ण दुर्गभ्रमंती असे उपक्रम राबविले.

पहिल्याच दिवशी श्रमदान करण्यात आले. त्याअंतर्गत किल्ल्यावरील बुजलेल्या टाक्‍यातील माती खोदून काढण्यात आली. सागरमाथा आणि सिंहगड प्रतिष्ठानच्या चाळीस सदस्यांनी त्यात सहभाग घेतला. सायंकाळी किल्ल्याच्या प्रभावळीतील गावकऱ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी सर्पदंश व त्यावरील प्रथमोपचार यावर स्लाईड शोद्वारे मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी निमगिरी गावातील शाळेसाठी भेट देण्यात येणाऱ्या पुस्तकांची दिंडी काढण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामध्ये भोसरीतील महात्मा फुले विद्यालयाच्या स्काऊट, आरएसपी आणि एमसीसीचे विद्यार्थी आपल्या बॅंड पथकासह, तर स्थानिक जिल्हापरिषद शाळा आणि न्यु इंग्लिश स्कूल, निमगिरीतील विद्यार्थी टाळ मृदंग व ढोलताशांचा गजरात सहभागी झाले होते. सुमारे 200 हून अधिक पुस्तके यावेळी शाळेला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी दुर्गभ्रमंती करण्यात आली, ज्यामध्ये दुर्ग अभ्यासक विनायक खोत यांनी मार्गदर्शन केले. महात्मा फुले विद्यालयाचे संचालक मंडळ आणि स्वर्गीय रमेश गुळवे यांच्या कुटुंबियांनी किल्ल्यांच्या पायथ्याला वृक्षारोपण केले.

या उपक्रमांसाठी जुन्नर वन विभागाचे म्हसे पाटील, यश मस्करे, रमेश खरमाळे, डॉ. सदानंद राऊत, निळकंठ लोंढे, विश्वनाथ लोंढे, राहुल तापकीर, योगेश गवळी, संतोष फुगे, नंदकुमार तापकीर, संदीप खराबे, चंद्रकांत वाघमारे, तसेच महेशदादा स्पोर्टस्‌ फाउंडेशन, मराठी देशा फाउंडेशन, सिंहगड प्रतिष्ठान, हाईट्‌स ट्रेकींग क्‍लब आदींचे सहकार्य लाभले. मुख्य समन्वयक एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, संस्थेचे सचिव प्रशांत पवार यांनी ही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)