साखर रोखणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

कोल्हापूर – गतवर्षी तोडलेल्या उसाचा दुसरा हप्ता 500 रुपये द्यावा अन्यथा 23 मे पासून राज्यभर साखर रोको आंदोलन केले जाईल, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन वारणा साखर कारखान्याला देण्यात आले. याबाबत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये योग्य तो निर्णय घेऊ असे कारखाना प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

सध्या साखरेचे वाढलेले दर, बॅंकांनी साखरेचे वाढवलेले मूल्यांकन, स्पिरिट आणि इथेनॉलचे वाढलेले दर, मोलॅसिस आणि बगॅसचे वाढलेले दर आणि राज्य शासनाने कमी केलेला 5 टक्के ऊस खरेदी कर, या सर्व बाबींचा विचार करता गतवर्षीच्या उसाला 500 रुपये प्रतिटन दुसरा हप्ता मिळाला पाहिजे अन्यथा 23 मे पासून राज्यभर साखर रोको आंदोलन केले जाईल अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)