साखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ

File Photo

पुणे – ऑईल कंपन्यांनी पेट्रोलियम अॅन्ड एक्‍सप्लोझीव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (पेसो)च्या नियमानुसार इथेनॉल प्रकल्प नसणाऱ्या उत्पादकांकडून इथेनॉल घेण्यास नकार दिल्यामुळे राज्यातील साखर कारखान्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे अडकण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

साखर कारखान्यांना जास्तीतजास्त इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक कारखान्यांनी प्रकल्प उभारून निर्मिती सुरू केली आहे. उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना पेसोची मान्यता घेण्याचे राष्ट्रीय हरित लवादाने आदेश काढले आहेत. त्याचबरोबर पेसोचे ना-हरकत प्रमाणपत्र असलेल्या उत्पादकांकडूनच ऑईल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी करावे, असे बंधन घातले आहे. त्यामुळेच या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश उत्पादकांनी पेसोच्या नियमाप्रमाणेच प्रकल्प उभारले असले तरी काही नियमामुळे प्रकल्पात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे. पेसोने या नियमांमध्ये बदल करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ यांच्यावतीने करण्यात आली आहे. या नियमाप्रमाणे उत्पादकांना काही प्रमाणात बांधकाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी 18 ते 24 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे हे बदल करण्यासाठी मुदत देण्यात यावी, असेही सुचविण्यात आले आहे. पण, अद्याप त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.

सध्याच्या आकडेवारीनुसार देशातील फक्त सहा प्रकल्पांना पेसोने प्रमाणपत्र दिले आहे. या प्रकल्पामधून 1430.46 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्याच्या निविदा ऑईल कंपन्यांनी मंजूर केल्या आहेत. त्यापैकी राज्यात फक्त 470.16 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठा होणार आहे. म्हणजे राज्याच्या एकूण मागणीच्या फक्त 11 टक्‍के इतकाच पुरवठा होणार आहे. यामुळे राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेसो व ऑईल कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांना नियमाप्रमाणे प्रकल्पात बदल करण्यासाठी दोन वर्षाचा अवधी द्यावा व गाळप हंगाम 2018-19 मध्ये निर्मिती केलेल्या इथेनॉलची खरेदी करावी. त्यासाठी केंद्र शासनाने या प्रकरणात लक्ष घालावे त्यामुळे साखर उद्योग अडचणीत येणार नाही. पर्यायाने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्‍कम देण्यासाठी सुद्धा कारखान्यांकडे पैसे उपलब्ध होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)