साखर कारखानदारांना चंद्रकांत पाटलांची फूस : राजू शेट्टी 

 

सदाभाऊ खोत अर्धाकच्चा पैलवान 
वस्ताद आपल्या चेल्याला सगळेच डाव कधीच सांगत नसतो. अर्ध्यापेक्षा अधिक डाव आत्मसात करण्यासाठी अक्कल असावी लागते आणि ती सदाभाऊ खोत यांच्याकडे नाही. त्यामुळे खोत हे अर्धेकच्चे पैलवान आहेत. आगामी निवडणुकीत ते आपल्यासमोर शड्डू ठोकून उभारले तरी आपण त्यांना सहज चारीमुंड्या चित करू, अशा शब्दात मंत्री सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टी यांनी खिल्ली उडवली. 

उस्मानाबाद: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना चंद्रकांत पाटील फूस लावत होते. आम्ही तुम्हाला लागेल तेवढा पोलीस बंदोबस्त देतो. पण कारखाने सुरू करा. स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनाला भीक घालू नका, अशा शब्दांत त्यांनी अनेकांना फोनवर पाठबळ दिले. मात्र कारखानदारांनी संघर्ष टाळण्यासाठी पाटील यांच्या म्हणण्याला केराची टोपली दाखवली, असा घणाघाती आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला.

-Ads-

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऊस आंदोलन मागे घेतल्यानंतर मराठवाड्यातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जुने सहकारी सदाभाऊ खोत यांच्यावर शेट्टी यांनी हल्लाबोल केला.
शेट्टी म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना आपला राग येणे साहजिकच आहे. ज्या काळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आपण बंदखोलीत खलबतं करायचो. तेव्हा चंद्रकांत पाटील दारात किंवा बाहेर उभे असायचे. त्यामुळे त्यांच्या मनात आजही ती सल तशीच कायम आहे. म्हणूनच ते आपल्याबाबत नेहमी आकांडतांडव करीत असतात.

राज्य सरकार आणि साखर कारखानदार दोघे मिळून संगनमताने शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन लूट करीत आहेत. त्यामुळेच आपण राज्यभरात चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सरकारने मध्यस्थी न करता एफआरपीनुसार भाव देण्यास आणि साखरेचे भाव वाढल्यास आगाऊ रुपये देण्यास तयारी दर्शविली. त्यामुळे आपण आंदोलन तूर्तास मागे घेतले, असे त्यांनी सांगितले.

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)