साखर उद्योगासाठी साडे पाच हजार कोटींचे विशेष पॅकेज

नवी दिल्ली – पुढच्या वर्षी 50 लाख टन साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 5,538 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. केंद्र सरकारकडून वाहतुकीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. नव्या हंगामात ऊस अनुदान 55 रुपयांवरुन 138.80 रुपये प्रति टन एवढे करण्यात आले आहे.

पुढच्या वर्षी देशातून 50 लाख टन साखर निर्यात करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे. यामुळे देशातील साखरेचे भाव वाढून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. साखर उद्योगासाठीचे हे दुसरे मोठे पॅकेज आहे. यापूर्वी जून 2018 मध्ये साडे आठ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मागच्या हंगामातील शंभर लाख टन आणि पुढे तयार होणारी साखर अशी एकूण 450 लाख टन साखरेचे उत्पादन होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना भाव देणे शक्‍य नसल्याने केंद्र सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 50 लाख टन साखर निर्यातीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. इथेनॉल दरात याआधीच 47 वरुन 59 रुपये अशी वाढ केली आहे.

वाहतुकीसाठी असे असेल अनुदान?
बंदरापासून 100 किमीच्या आत अंतर असेल, तर एक हजार रुपये
बंदरापासून 100 किमीपेक्षा जास्त अंतरावर अडीच हजार रुपये
ज्या राज्यांना समुद्र किनारा नाही, त्यांना 3000 रुपये वाहतूक अनुदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)