साखर उद्योगाला अडचणीतून काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती

पुणे, – साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून या उद्योगाला आर्थिक मदत करण्याची मागणी करणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साखर उद्योगाच्या प्रतिनिधीची बैठक नुकतीच झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख,अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखान संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, साखर संघाचे संचालक संजय खताळ, साखर संघाचे प्रतिनिधी प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.

बैठकीमध्ये साखरेचे जादा उत्पादन, घटलेली मागणी यामुळे एफआरपीदेण्यात निर्माण झालेली अडचण, बॅंकेकडून कमी झालेले साखरेचे मुल्याकंन, शासनाचा थकीत जमा करण्याचा तगादा, साखर निर्यातीतील अडचणी, उद्योगांचा महसूल उत्पन्नाचा तुटवडा याबाबीवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने साखर निर्यात व वाहतुकीसाठी अनुदान देण्याची मागणी उद्योगाकडून करण्यात आली. सहकारमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समिती तोडगा सुचविणार आहे. राज्य पातळीवर मदत करावी लागणार आहे. त्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
…………….

साखर उद्योगांच्या अडचणी
1) साखर परराज्यात विक्री करण्यासाठी अनुदान द्यावे
2) 2018-19 चा गाळप हंगाम ऑक्‍टोबरपासून सुरू करावा
3) उसाच्या ठिबक सिंचना करीता आर्थिक तरतूद वाढविण्यात यावी
4) राज्य शासनाने दहा लाख टन साखर त्वरीत खरेदी करावी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)