साखर आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीचा सोमवारी “हल्लाबोल’

सोलापूर (प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयावर खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभेच्या सात जागा लढवणार
स्वाभिमानी संघटनेने आघाडीशी युतीची चर्चा थांबविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार असून राज्यातील कोल्हापूर, हातकणंगले, माढा, बुलढाणा, सांगली, नंदुरबार, धुळे या सात जागांवर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाची एक रकमी एफआरपी दिलेली नाही. राज्यातील 73 साखर कारखान्याकडे 5320 कोटी 36 लाख रुपये एफआरपी थकीत असून आहे. ऊस गळितास गेल्यानंतर 14 दिवसात उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे हा नियम आहे. मात्र, साखर कारखानदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवला आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी कारखानदारांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही असे असताना सरकारने देखील अशा कारखान्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तरी राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी द्यावी, या मागणीसाठी हा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार असून एक रकमी एफआरपी दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)