साखरेचे खाणार, त्याला पुणे जिल्हा देणार

पुणे- जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा हंगाम वेगात सुरू असून तो साधारणत: 15 मेपर्यंत सुरू राहील, असा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत 103 लाख 7 हजार 789 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. 115 लाख 52 हजार 170 क्‍विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी 11.21 टक्के साखर उतारा असल्याचे साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.

जिल्ह्यात उसाचे सुमारे 1 लाख 30 हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असते. यंदाही मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. आत्तापर्यंत 70 ते 80 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यात एकूण 17 साखर कारखाने आहेत. यात सहकारी 11; तर खासगी 6 साखर कारखान्यांचा समावेश आहे.

या सर्व कारखान्यांमध्ये 1 ते 31 नोव्हेंबर या कालावधीत गाळप सुरू झाले होते. या कारखान्यांची दैनंदिन ऊस गाळप क्षमता जवळपास 2.5 ते 8 हजार मेट्रिक टन एवढी आहे. सध्या कारखान्यांचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम 15 मेपर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी 66 लाख 76 हजार 942 टन उसाचे गाळप केले आहे.

साखरेचे 74 लाख 27 हजार 815 क्विंटल साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा 11.12 टक्के एवढा आहे. खासगी साखर कारखान्यांनी 36 लाख 30 हजार 847 टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचे 41 लाख 24 हजार 355 क्विंटल उत्पादन झाले आहे. साखर उतारा 11.21 टक्के एवढा आहे.

बारामती ऍग्रो, दौंड शुगर आघाडीवर
जिल्ह्यात बारामती ऍग्रो साखर कारखान्याने सर्वाधिक 10 लाख 5 हजार 250 मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून साखरेचे 11 लाख 43 हजार 600 क्विंटल साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा 11.38 टक्के एवढा आहे. दौंड शुगर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. तेथे सरासरी 11.80 टक्के साखर उतारा आहे. या कारखान्याने 8 लाख 79 हजार 890 टन उसाचे गाळप केले. त्यातून 10 लाख 38 हजार 100 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)