साकोरीत बिबट्याच्या हल्ल्यातून बाप-लेक बचावले

संग्रहित छायाचित्र...

बेल्हे- “काळ आला होता; पण वेळ आली नव्हती,’ या म्हणीचा प्रत्यय साकोरी (ता. जुन्नर) शिवारातील एका तरुणाला आला. बुधवार (दि. 23) रात्री गुरगुरत आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली; पण अंदाज फसल्याने सुदैवाने तरुणाचे प्राण बचावले.
याबाबत समजलेली हकीकत अशी की, साकोरी (ता. जुन्नर) गावाच्या उत्तरेला आसामी शिवारात सौरभ शांताराम गाडगे हे बाप-लेक मोटारसायकलवरून घरी परतत असताना, दबा धरलेल्या बिबट्याने त्यांच्या मोटारसायकलवर झेप घेतली. बिबट्याची झेप मोटारसायकलवर पडली; पण मोठ्या धाडसाने सौरभने मोटारसायकल तशीच पुढे घेऊन गेल्याने दोघेही बाप-लेक वाचले. बिबट्याच्या या हल्ल्यात सौरभ याच्या पायाच्या मांडीला आणि घोट्याला बिबट्याच्या पंज्याने जखमा झाल्या असून, त्याला तातडीने उपचारासाठी निमगावसावा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी बिबट्याचे ठसे आढळून आले,येथे आज सायंकाळपर्यत पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरादिवसांपूर्वी याच परिसरात एका शेतकऱ्याच्या चार शेळ्यांवर बिबटयाने हल्ला करून ठार केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)