साकारली पवनामाईची विविध रुपे

पिंपरी – पवना जलमैत्री अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त जलदिंडी प्रतिष्ठान व भावसार व्हिजन पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील दुर्गादेवी टेकडीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मी पाहिलेली पवनामाई या विषयावरील या स्पर्धेत 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पवनामाईची विविध रुपे विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने साकारली. जलदिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. विश्वास येवले, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे, संस्कार प्रतिष्ठानचे मोहन गायकवाड, रोटरी क्‍लब वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, अंघोळीची गोळीचे सचिन काळभोर, सूर्यकांत मुथियान, अविरत परीश्रमचे भैय्यासाहेब लांडगे, ग्राफिटी कंपनीचे विजय शिंदे, उमेश वाघेला, वर्षा लडकत, विनीता कुलकर्णी, भावसार व्हिजनचे व जल दिंडी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

-Ads-

पवनामाई जलमैत्री अभियानाची सुरवात 20 डिसेंबर रोजी व सांगता समारंभ 21 डिसेंबर रोजी होणार आहे. चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ दि. 21 डिसेंबरला चिंचवड येथील मोरया घाट येथे करण्यात येणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)