साऊथचे तीन स्टार एकत्र…

बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांचा  वेगळा चाहतावर्ग आहे. अॅक्शन आणि मसालेदार कथा असलेले दाक्षिणात्य चित्रपट डब झाल्यानंतरही टीव्हीवर विशेष गाजतात. महेश बाबू, रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर यांसारख्या साऊथ सुपरस्टार्सचे चाहतेसुद्धा असंख्य आहेत. साऊथच्या या तीन सुपरस्टार्सना एकाच फ्रेममध्ये पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच असते. अशातच सोशल मीडियावर या तिघांचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

रामचरण, ज्यु. एनटीआर आणि महेश बाबूचा हा ‘कॅन्डीड मूमेंट’ चाहत्यांना फारच आवडला आहे. ऑनस्क्रीन या तिघांमध्ये जरी स्पर्धा असली तरी यांच्या ऑफस्क्रीन मैत्रीवर त्याचा कोणताच परिणाम झालेला दिसून येत नाही. या फोटोमध्ये तिघंही मुक्तपणे हसताना पाहायला मिळत आहेत.

महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर तगडी कमाई केली. याच चित्रपटाचे निर्माते धनय्या यांनी आगामी ज्यु. एनटीआर आणि रामचरण यांच्या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)