साई समाधी शताब्दीनिमित्त 1 ऑक्‍टोबरपासून वर्षभर उपक्रम

शिर्डी – साई समाधी शताब्दी निमित्त दि.1 ऑक्‍टोबर 2017 पासून वर्षभर उपक्रम ठरविण्यासाठी लायन्स क्‍लबच्या पुढाकाराने शिर्डीतील काही सामाजिक संघटना यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती लायन्स क्‍लबचे अध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर यांनी दिली. यावेळी लायन्स क्‍लबचे सचिव दिलीप वाकचौरे, विकास शिवगजे, भाऊसाहेब लवांडे, गंगाधर वरघुडे, प्रा.रघुनाथ गोंदकर, गोकुळ शिंदे उपस्थित होते.

शिर्डी येथील हॉटेल केबीज ग्रॅंड येथे झालेल्या बैठकीत क्‍लीन ग्रीन ऍन्ड क्‍लिन शिर्डीचे अजित पारख, जितेंद्र शेळके, मणिलाल पटेल, साई योगा परिवाराचे डॉ. नचिकेत वर्पे, रोटरी क्‍लबचे डॉ. मधुकर देशमुख, डॉ. पांडुरंग गुंजाळ, साई खिचडीचे वाटप कार्यक्रमाचे बाळासाहेब घाडगे, शिवाजी सोमवंशी, लायनेस क्‍लबच्या अध्यक्षा रजनी गोंदकर, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुनीता तांबे, सुनील सदाफळ, साई भजन गायक विश्‍वनाथ ओझा, विनोद कुरूप, विनोद गोंदकर, मराठा सेवा संघाचे दशरथ गव्हाणे, हॉटेल कलासाईचे संचालक आदींनी चर्चेत सहभाग घेतला. पुढील बैठकीत आणखी काही संघटना सहभागी होणार असून त्यावेळी उपक्रम आराखडा निश्‍चित करण्याचे ठरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)