साई मंदिरातील देवीच्या मूर्तीची चोरी

पिंपरी – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी चार हजार रुपये किंमतीची देवीची पितळी मूर्ती चोरून नेली. ही घटना आळंदीजवळील डुडुळगाव येखील साई मंदिरात नुकतीच उघडकीस आली.

वसंत विठोबा गुंडपीकर (वय-62, रा. स्वप्नपूर्ती बिल्डिंग, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीजवळील वडमुखवाडी-चऱ्होली येथे साई मंदिर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुधवारी (दि. 27) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास येथील साई मंदिराच्या आत असलेल्या दुर्गामाता मंदिराच्या गाभाऱ्यातील देवीची चार किलो वजनाची पितळी मूर्ती चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरून नेली. वसंत गुंडपीकर हे नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात गेले असताना मूर्तीची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, सतत वर्दळ असलेल्या या ठिकाणी चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. पगारे अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)