साई बाबांच्या पालखीचे मंचरला स्वागत

मंचर- साई सेवा संघ मंचर यांच्या वतीने साई-सेवा संघ लोणावळा, खंडाळा येथून पायी आलेल्या पालखी सोहळ्याचे मंचर येथे स्वागत करण्यात आले. यावेळी भाविक-भक्तांसह ग्रामस्थ उपस्थित होते. रायगड व मावळ तालुक्‍यातील लोणावळा खंडाळा येथून सर्वप्रथम निघणारी ही पदयात्रा बुधवारी (दि. 9) शिर्डी येथे पोहचणार आहे. येथील साईभक्त नरहरी रंगनाथ वळसे पाटील, रमेश पांडुरंग शेटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादाचे भोजन झाल्यानंतर पालखीचे प्रस्थान शिर्डीच्या दिशेने झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)