साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रेचे आयोजन

जिल्हास्तरीय प्रदर्शन 10 ते 14 जानेवारीला : 250 स्टॉलची उभारणी

नगर: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत येत्या 10 ते 14 जानेवारी दरम्यान गुलमोहर रस्त्यावरील तांबडकर मळा येथे दरवर्षीप्रमाणे साई ज्योती स्वयंसहाय्यता यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यंदा जिल्हास्तरीय प्रदर्शन होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या साहित्यांची विक्री व प्रदर्शन राहणार आहे. 2009-10 पासून हे प्रदर्शन भरविण्यात येते. आतपर्यंत 9 वेळा झालेल्या प्रदर्शनात पाच वेळा विभागीयस्तरीय प्रदर्शन झाले. गेल्या वर्षी झालेल्या विभागीय प्रदर्शनात तब्बल 3 कोटी 4 लाख 72 हजार रुपये उलाढाल झाली होती. ही उलाढाल गेल्या आठ प्रदर्शनातील विक्रमी उलाढाल ठरली आहे, असे सांगून विखे म्हणाल्या की, या प्रदर्शनात 250 स्टॉलचे नियोजन करण्यात आले असून खाद्यपदार्थाने 70 स्टॉल राहणार आहे. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. यात शोभेच्या वस्तू, बेंन्टेक्‍स ज्वेलरी, लेदरच्या वस्तू, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, हॅण्डलूस, वनौषधी उत्पादने, विविध प्रकारचे मसाले, सेंद्रीय हळद, आवळा उत्पादने, त्याबरोबर मांडे, शिपी आमटी, सोयबीन चिल्ली, थालीपीठ, खानदेशी भरीत, शिंगोरी आमटी आदी खाद्यपदार्थांची रेलचेल या प्रदर्शनात राहणार आहे.

जिल्ह्यात महिला बचत बटांनी तयार केलेल्या वस्तूंना मोठी मागणी असते. त्यामुळे दरवर्षी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते. महिला पत वाढविण्यबरोबरच सक्षमीकरणासाठी हे प्रदर्शन उपयुक्‍त ठरत आहे. जिल्ह्यात 10 हजार 400 बचत गट असून आता नव्याने 2 हजार 700 गट उभारण्यात आले आहेत. त्यात 925 गटांना भागभांडवलासाठी प्रत्येकी 15 हजार रुपये देण्यात आले असून असे 1 कोटी 64 लाखांचे वाटप झाले आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक परिक्षित यादव यांनी दिली. प्रदर्शनात जास्तीतजास्त बचतगटांनी सहभागी घ्यावा तसेच या प्रदर्शनाचा लाभ नगरकरांनी द्यावा असे आवाहन विखे यांनी केले.


तर अधिकाऱ्यांवर कारवाई
या प्रदर्शनात महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तू ठेवण्यात याव्यात. तयार वस्तू आणू नयेत, तसेच हॉटेल व्यवसायिकांना या प्रदर्शनात सहभागी होण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तर हॉटेल व्यावसायिक या प्रदर्शनात दिसले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा विखे यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)