साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूलचा वर्धापन दिन साजरा

नगर – साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरूवार 15 जून रोजी द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव करपे पाटील हे होते. यावेळी संस्थाचालक लता करपे पाटील, संचालिका सायली करपे पाटील, शाळेचे प्राचार्य विकास चौधरी तसेच श्रीकांत भगत उपस्थित होते.

या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव करपे यांनी अध्यक्षस्थानी बोलताना अहमदनगर शहरात विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने साई एंजल्स इंटरनॅशनल स्कूल ही शाळा स्थापन केल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात विद्यार्थी धनंजय आंधळे, स्वरदा जोशी व वेदश्री देशपांडे यांनी शाळेविषयी आपले मनोगत व्यक्‍त केले तसेच पर्यावरणाचे व स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. शाळेत सुरूवातीपासून असलेल्या शिक्षकांच्या, कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात शाळेचे को. ऑरडीनेटर नवाझ पठाण व शाळेचे शिक्षक चंद्रकांत वंजारी यांनी शाळेविषयी जुन्या आठवणी सांगितल्या तसेच शाळेचे प्राचार्य विकास चौधरी यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धामध्ये भाग घेऊन आपल्या सर्वांगीण विकास साधत शाळेचा नावलौकिक वाढविला पाहिजे, असे याप्रसंगी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका पोपटानी व सूर्यकांत बंगारी यांनी केले तर आभार प्रदर्शन राजश्री दहातोंडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)