साईबाबा कन्या विद्यालयात स्वच्छतादिन साजरा

शिर्डी – शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचालित श्री साईबाबा कन्या विद्यालयात स्वच्छता दिना निमित्त स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विध्यार्थ्यीनींनी विद्यालयाचा संपूर्ण परिसर स्वच्च करून स्वच्छतेविषयी जनजागृती केली. याउपक्रमात सर्व विद्यार्थिनी, मुख्याध्यापक वरघुडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतरांनी सहभाग घेतला.
यावेळी वसंत वाणी यांनी स्वच्छतेचे महत्व सांगत देश स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे सांगितले. तसेच स्वच्छता कवितेचे वाचन केले. बाजीराव वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील कचरा शिक्षक व विद्यार्थी यांनी जमा करून कचराकुंडीत टाकला. यावेळी विद्यार्थ्यांवर कृतियुक्त स्वच्छता संस्कार करण्यात आले. यापुढेही विद्यालयात विद्यार्थीहितकारक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक वरघुडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)