साईनाथ रुग्णालयाच्या पार्कीगमधुन दुचाकी चोरी

शिर्डी- साईनाथ रुग्णालयाच्या पार्कीगमधुन होन्डा कंपनीची मोटार सायकल चोरीला गेली आहे. रुग्णालयाच्या आसपास सर्वत्र सुरक्षा रक्षक तैनात असताना सर्रासपणे मोटार सायकल चोरीला जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पाळत ठेवुन मोटार सायकल चोरी करणारे रॅंकेट कार्यरत असल्याचे दिसत आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्‍यातील कोपरडा येथील शेतकरी एकनाथ पाटीलबा वाबळे हे 16 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पत्नी तुळशाबाई यांच्यावर उपचार करण्यासाठी साईनाथ रुग्णालयात घेऊन आले होते. त्यांनी मोटार सायकल क्रमांक एम.एच. 20 सी.क्‍यु. 2117 वाहनतळा पार्कींग केली होती. डॉक्‍टरांना दाखविल्या नंतर डॉक्‍टरांनी दुस-या दिवशी येण्यास सांगितले.त्यामुळे पुन्हा पार्कींग केलेल्या ठिकाणी मोटार सायकल घेण्यासाठी गेले असता ठिकाणी मोटार सायकल दिसली नाही. सर्वत्र शोधाशोध केला, मात्र गाडी आढळुन आली नाही. अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरुन नेली. याबाबत शिर्डी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)