साईटवरून पडून कामगाराचा मृत्यू

पिंपरी – बांधकाम साईटवर पेंटिंगचे काम करणाऱ्या कामगाराचा उंचावरून पडून मृत्यू झाल्याची घटना स्वस्तिक माणस साईट, महाळुंगे येथे घडली.

राधेश्‍याम रामबच्चन वर्मा (वय- 33) असे मृत कामगाराचे नाव आहे. राकेश रामबच्चन वर्मा (वय- 25, रा. पाटीलनगर, थेरगाव. मूळ रा. बौरब्यास, संत कबीर नगर, उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तुषार पाडाळे (वय- 45), विजय बालवडकर (पूर्ण पत्ता माहिती नाही.) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही सुरक्षा साधने नसताना राधेश्‍याम रामबच्चन वर्मा यांच्याकडून पेंटींगचे काम करुन घेतले जात होते. हे काम करत असताना पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)