साईज्योती स्वयंसहायता यात्रेत 30 लाखांची उलाढाल

नगर  – महाराष्ट्र व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्‍त विद्यमाने ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता बचत गटांनी व ग्रामीण कारागिरांनी उत्पादीत केलेला माल व वस्तुच्या विक्रीसाठी भरविण्यात आलेल्या साईज्योती स्वयंसहाता यात्रेत आतापर्यंत 28.44 लाखाच्या आसपास उलाढाल झाली आहे.

प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी शनिवार असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. आज जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती असल्याने यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. राहाता तालुक्‍यातील पाचशे ते सहाशे महिला बचत गटांनी एकत्र येऊन साईबाबांना वाहण्यात येणाऱ्या हार व फुले यांच्या निर्मल्यापासून साईद्वारकामाई सेंद्रीय सुंगधी अगरबत्तीची निर्मिती केली तसेच झेंडूपासून सुंगधी अष्टगंध फुलाच्या अर्कापासून दिवे व धूप असलेल्या या स्टॉलवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्टॉलची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले. नगर तालुक्‍यातील श्रीकृष्ण महिला बचत गटाचे हुरड्याचे थाळीपिड, मुगाचा डोसा आणि मल्हारी मार्तंड गटाची तिखट करंजी मुगाचे कोंडूळे, हुलग्याची शेवंती यांनी खाद्य पदार्थांनी प्रदर्शनातील चांगली गर्दी खेचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)