साईज्योती महिला स्वयंसहय्यता यात्रेची कोटीची उड्डाणे

नगर: महाराष्ट्र शासन व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांच्यासंयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियांनांतर्गत बचत गटांनी व ग्रामिण कारागीरांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी भरविण्यात आलेल्या साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रेने आज 1कोटी 27 लाख रुपयांचे लक्ष्य गाठले.प्रदर्शनाचा आज चौथा दिवस होता. सुटीचा वार असल्याने ग्राहकांनी आज प्रदर्शन स्थळी चांगलीच गर्दी केली होती.

साई ज्योती यात्रेच्या सहभागी स्टॉलची पहिल्या दिवशी 13.63लाख ,दुसऱ्या दिवशी 28.44लाख तिसऱ्यादिवशी 37.48 लाख तर चौथ्या दिवशी 49.21लाख अशी आतापर्यंत 1कोटी 27 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. आज प्रदर्शनाला अनेक मान्यवरांनी भेटे दिली शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जामखेडच्याक्रांतीसूर्य बचत गटाचे पाथ्रुडचे पेढे, कर्जतच्या श्रीशक्ती महिला बचतगटाची शिपी आमटी या स्टॉल्सवर ग्राहकांची विषेश गर्दी दिसत होती तर राहुरीच्या विट्ठल महिला बचत गटाने बनविलेल्या टॉयलेट क्‍लीनर, पारनेरच्या मुक्‍ताई बचत गटाने विणलेल्या लोकरीच्या घोंगडी ,गव्हाळे तसेच गोसपाक बचत गटाच्या राजस्थानी बॅग, पाथर्डीच्या धनश्री बचत गटाच्या शेव ,रेवडी व सरबताला तसेच जिरेवाडीच्या शिवशंभो बचत गटाच्या शिंगोरी आमटी व थालीपीठ तसेच राहुरीच्या बचत गटाची हुलग्याच्या आमटीला नगरकरांची विशेष पसंती असल्याचे दिसत होते.
रविवार सुट्टीचा वार असल्याने नगरकरांनी प्रदर्शनाला मोठी गर्दी केल्याचे दिसत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)