साईआश्रम भक्‍तनिवासात चोरी

शिर्डी – श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भुवनेश्वर येथून आलेल्या साईभक्तांचे रोख रक्कम, तीन मोबाईलसह सोन्याची अंगठी असा 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल साईआश्रम भक्तनिवासमधून लांबविल्याची घटना रविवारी सकाळी घडली.

ओरीसा ऱाज्यातील भुवनेश्वर येथून तपस्विनी भोईदार हे आपल्या नऊ जणांच्या कुटुंबासमवेत साईदर्शनासाठी दि.9 रोजी शिर्डीत आले होते. त्यांनी संस्थानच्या साईआश्रम भक्तनिवासात रूम घेतल्या होत्या. दि.10 रोजी सर्व परिवाराने साईचे दर्शन करून मुक्काम केला.रविवारी कॅशकाऊंटीगला जाण्यासाठी सर्वांनी आपले मोबाईल, पैसे, आणी सोन्याची अंगठी रूममधील बॅंगमध्ये ठेवून रूमला कुलुप लावुन मंदिरात गेले होते. मंदिरातून परत आल्यानंतर रूमला कुलुप न दिसल्याने सर्वजण घाबरून गेले. रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बॅग आढळुन न आल्याने त्यांनी आसपास शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना बॅगा मिळाल्या नसल्याने शिर्डी पोलीसांत तक्रार दाखल केली असता शिर्डी पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)