साईंच्या झोळीत भाविकांकडून तीन कोटी 18 लाख

दीपावलीच्या सहा दिवसांत चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन

शिर्डी – साईसमाधी शताब्दी वर्षानंतर पहिल्यांदाच आलेल्या दीपावली उत्सवात सुमारे चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले. यादरम्यान भाविकांनी साईबाबांच्या झोळीत 3 कोटी 18 लाख 49 हजार रुपयांचे दान टाकल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या लेखा शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डीतील साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला असून, साईंच्या प्रती विदेशी भाविकांचीही श्रद्धा वाढली आहे.

-Ads-

साईबाबांच्या समाधीला मागील महिन्यात विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण झाली. शताब्दी वर्षानंतर पहिल्याच दीपावली उत्सवास शिर्डीत देश-विदेशातील लाखो भाविकांनी साईचरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दी केली होती. मागील सहा दिवसांत देश-विदेशातील भाविकांनी साईबाबांच्या झोळीत तीन कोटी अठरा लाख 49 हजार रुपयांचे दान टाकल्याचे साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी यांनी माहिती दिली. यादरम्यान चार लाखांपेक्षा जास्त श्रद्धाळूंनी साईसमाधीचे दर्शन घेतले. साईबाबांवर मोठ्या संख्येने भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे दीपावलीनिमित्त अनेक भक्त आवर्जून दर्शनासाठी येतात. यंदाच्या दीपावली उत्सवात सुमारे तीन कोटी अठरा लाख 49 हजार रुपयांचं घसघशीत दान आलं आहे.

देणगी स्वरुपात 1 कोटी 64 हजार 318 रुपये दान आले आहे. देणगी काउंटरवरुन डी. डी. व धनादेशाद्वारे 45 लाख 73 हजार रुपये दान मिळाले आहे, तर मनीऑर्डरने 3 लाख 51 हजार रुपये, तसेच डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे 33 लाख 60 हजार रुपयांचे दान जमा झाले आहे. ऑनलाईन देणगीतून 24 लाख 86 हजार रुपये प्राप्त झाले आहेत, तर याच दरम्यान 6 लाख 66 हजार रुपये सोन्याच्या रुपाने 236.50 ग्रॅम वजनाचे दान आले आहे. 1 लाख 49 हजार 247 रुपयांची 5 किलो 153 ग्रॅम वजनाची चांदी आलेली आहे. त्याचप्रमाणे विविध देशांतील परकीय चलन आलेले आहे. प्रसादालयात 3 लाख 7 हजार 847 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे, तर 50 हजार 746 भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला असून, याद्वारे 2 लाख 53 हजार 730 रुपये मिळाले आहेत.

दरम्यान 4 लाख 50 हजार 400 भाविकांना मोफत बुंदीच्या लाडूंची पाकिटे देण्यात आली आहेत. 1 लाख 80 हजार 520 लाडू पाकिटांच्या विक्रीतून 36 लाख 10 हजार 400 रुपये प्राप्त झाले आहेत. दरम्यान साईबाबा संस्थानकडे आज रोजी 2 हजार 195 कोटी रुपयांच्या बॅंकेत ठेवी असून, 431 किलो सोने व 5 हजार 32 किलो चांदी जमा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)