सांविधानिक नैतिकता प्रस्थापनेची जबाबदारी प्रत्येकावर : प्राचार्य डॉ. हरिष भालेराव 

शिवाजी विद्यापीठात संविधान दिन उत्साहात

कोल्हापूर – देशात उच्च प्रतीची सांविधानिक नैतिकता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. हरिष भालेराव यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने संविधान दिनानिमित्त “भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे’ या विषयावर डॉ. भालेराव यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-

मानव्यशास्त्र अधिविभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर प्रमुख उपस्थित होते. डॉ. भालेराव यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी झालेल्या जागतिक प्रयत्नांचा वेध घेतला. लोकशाही पद्धती हीच भारतीयांची जीवनशैली असली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, नागरिकांना मुक्त वातावरणात जीवन जगता आले पाहिजे.

यासाठी मूलभूत हक्कांची गरज असते. भेदाभेदाने व्याप्त, विषमतायुक्त समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता या मूल्यांची प्रस्थापना करण्याचे ध्येय संविधान बाळगून आहे. सांविधानिक नैतिकतेला आव्हान देता येणार नाही. भारतीय संविधानात समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि सांविधानिक उपाय योजण्याचा हक्क या मूलभूत हक्कांचा समावेश आहे. राज्याने कसे वागावे, हे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात आणि ती राज्याची धोरणाबाबतची नैतिकता आहे.

विकास, चौकसबुद्धी, मानवतावाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना देणारी आपली मार्गदर्शक तत्त्वे असून त्यामध्ये पर्यावरण आणि पशू यांच्या संदर्भातही सजगतेचा आग्रह दिसून येतो. धोरणे आखताना मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धोरणांच्या सकारात्मक अंमलबजावणीसाठी राजकीय नैतिकता कळीची भूमिका बजावत असते, असेही डॉ. भालेराव यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)