सांभाळ करण्याच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पिंपरी, दि.12 (प्रतिनिधी) आई-वडिल नसलेल्या अल्पवयीन मुलीचा सांभाळ करण्याचे व लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून वाहनचालकाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार नुकताच पिंपरीतील, नेहरुनगर येथे उघडकीस आला.
याप्रकरणी आनंद हरि पवार (वय 45, रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक करण्यात आले आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 13 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला आई-वडिल नसल्याने ती आजीकडे राहते. तर, आरोपी आनंद हा तिच्या आजीकडे गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत आहे. आरोपी आनंद हा पीडित मुलीच्या घरी दररोज जेवण करण्यासाठी येत असे. तो वाहन चालक असल्याने रात्री उशिरा घरी येत होता.पाणी घेण्याचे निमित्त करुन पीडित मुलीच्या घरी येऊन तिच्याशी अश्लिल वर्तन करत असे. त्याने “तुझा मी सांभाळ करतो, तुला घर घेऊन देतो आणि तुझे लग्न लावून देतो’ असे सांगून तिच्याशी जबरदस्तीने 17 मार्च ते डिसेंबर 2016 दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. त्याच्यापासून ती गरोदर राहिली . त्यानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने तिचा सांभाळ करण्यास सांगितल असता त्याने नकार दिला आहे. त्यामुळे पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रत्ना सावंत तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)