सांडभोरवाडी-काळूस गटाकरिता 9 कोटी निधी

संग्रहित छायाचित्र....

राजगुरुनगर- सांडभोरवाडी-काळूस जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून लवकरच ही कामे सुरु होतील, अशी माहिती या गटाचे सदस्य बाबाजी काळे यांनी दिली. सांडभोरवाडी-काळूस जिल्हा परिषद गटात शिरोली ते खरपुडी खुर्द (2 कोटी), काळेचीवाडी,बहीरवाडी रस्ता प्र.जि.मा ते सौरंग्या ठाकरवाडी रस्ता (2 कोटी 70 लाख), वाफगाव रस्ता, जरेवाडी फाटा ते जरेवाडी (1 कोटी 50 लाख), भोसे गाव ते गांडेकरवस्ती रस्ता (2 कोटी 70 लाख) या रस्त्यांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली होती. दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी होत असल्याने आमदार सुरेश गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत या कामांसाठी निधी मिळाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात ही कामे सुरु होणार असल्याचे बाबाजी काळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)