सांडपाण्याचा पुनर्वापर पिण्याच्या पाण्यासाठी होणार

स्मार्ट सिटी उभारणार पथदर्शी प्रकल्प; पीपीपी तत्त्वावर उभारणी

पुणे : स्मार्ट सिटीकडून सांडपाण्याचा पुनर्वापर करून हे पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी प्रायोगिक पातळीवर 20 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प बाणेर येथे उभारला जाणार आहे. खासगी-सहभागी-भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मार्ट सिटी अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांसाठी बाणेर-बालेवाडी भागाची निवड करण्यात आली आहे. त्या अंतर्गत स्मार्ट सिटीकडून शहरासाठी भविष्यात शहरासाठी उपयोगी पडतील अशा प्रकारचे प्रकल्प उभारले जात आहेत. त्या अंतर्गत आता, स्मार्ट सिटीकडून या भागात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्यायोग्य अथवा इतर कामांसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 80 ते 90 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून हे काम करणारी कंपनीच हा खर्च करणार आहे. तसेच या प्रकल्पाची देखभाल दुरुस्तीही केली जाणार आहे. सध्या महापालिकेकडून शुद्ध केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे त्या पाण्याचा काहीच वापर होत नाही. मात्र, या प्रकल्पामध्ये तीन टप्प्यात प्रकल्प उभा करून पिण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच बांधकामासाठीही हे पाणी वापरणे शक्‍य असणार असल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले.

11 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे…
या प्रकल्पातून शुद्ध होणारे पाणी हिंजवडी आयटी कंपन्यातील कुलिंग यंत्रणा, बांधकामे तसेच उद्यानासाठी वापरणे शक्‍य होणार आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असणार असून त्याची यशस्वीपणे अमंलबजावणी झाल्यास, महापालिकेसही अशा प्रकरचा प्रकल्प राबविता येणार आहे. महापालिकेकडून नदी सुधार योजनेंतर्गत सुमारे 950 कोटींचा प्रकल्प राबविण्यात येत असून 11 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली जाणार आहेत. त्या ठिकाणीही अशा प्रकारचा प्रकल्प राबविला गेल्यास महापालिकेची धरणातील पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)