सांगुर्डीतील अर्धवट पुलाच्या कामासाठी सुरू असलेले उपोषण आश्‍वासनाने मागे

देहुरोड – सांगुर्डी (ता. खेड) येथे आठ वर्षांपासून रखडलेल्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत भसे यांनी सुरू केलेले उपोषण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर शनिवारी (दि. 6) अखेर मागे घेण्यात आले.

खेड तालुक्‍यातील सांगुर्डी येथे सांगुर्डी-बोडकेवाडी दरम्यान इंद्रायणी नदीवरील अर्धवट व प्रलंबित असणाऱ्या पुलाचे काम हे सुधारीत पद्धतीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरू होते. खेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बी. पी. क्षीरसागर आणि कनिष्ठ अभियंता एस. एस. पवार यांच्या लेखी आश्‍वासनानंतर दोन दिवसांनी उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणकर्ते भसे यांच्या मागणीनुसार ग्रामस्थ व तांत्रिक बाबींचा विचार करून कार्यवाही करण्याची लेखी हमी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना देण्यात आली.

-Ads-

या वेळी माजी आमदार दिलिप मोहिते, बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, देहूचे माजी उपसरपंच प्रकाश हगवणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक मारूती भसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, कृष्णा भसे, भीमराव चव्हाण, राजू भसे यांच्यासह सांगुर्डी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)