सांगिसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभा गरुड

सांगिसे : ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी शोभा गरुड यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना सरंपच बबनराव टाकळकर व ग्रामपंचायत सदस्य.

कार्ला – सांगिसे, बुधवडी, वेल्हवळी गावाची सांगिसे ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शोभा सदाशिव गरुड यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सर्वानुमते निवडून आलेले सरंपच बबनराव टाकळकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेली उपसरपंचपदाचा निवडणुकीत शोभा गरुड यांचा एकमेव अर्ज आल्याने सरंपच टाकळकर व सहाय्यक अधिकारी ग्रामसेवक जी. पी. सानप यांनी गरुड यांची उपसरपंचपदी निवड जाहीर केली.

या वेळी गरुड व सरंपच टाकळकर यांचा ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्‍वर भांगरे, विष्णू जाधव, विलास मानकर, श्रद्धा महेश दळवी, संगीता संतोष टाकळकर, चंदाताई संतोष पिंगळे यांनी नवनिर्वाचित सरंपच, उपसरपंच यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. या वेळी गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)