सांगा,पोलीस दादांची गाडी जाणार कशी?

सातारा जेलच्या शेजारी असलेल्या नाल्यावरील रेलींग जाळीवरून धोकादायक प्रवास करताना वाहनधारक

नाल्यावरील लोखंडी जाळी मोडल्याने धोकादायक प्रवास
सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) – सातारा शहर पोलीस ठाणे ते सातारा नगरपरिषदेकडे जाण्याच्या मार्गावर दोन्ही बाजूला नाल्यावरील लोखंडी जाळी मोडली आहे. या ठिकाणी मोठया दगडांची मांडणी करून देखील धोकादायक पध्दतीने वाहतुक सुरू आहे. सातारा शहर पोलीस मोटार वाहनांसाठी येणा जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
सातारा शहरात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करताना कर्तव्यदक्ष पोलीस दादांच्या गाड्या जाण्यासाठीही गेले अनेक दिवस अडथळा येत आहे. सातारा पोलीस मोटार वाहनतळ या ठिकाणी असल्याने. कायमच या रस्त्यावरून पोलीस दादांना नित्याचा प्रवास करावा लागतो. या रसत्यावरून पोलीसांच्या मिनी लक्‍झरी, सुमो, बलेरो, कार, दुचाकी गाड्या, डिझेलचा टॅंकर, क्रेन, याबरोबरच काही वेळेला शहर एसटी तसेच सातारकर नागरिकांची कायमच वाहतुक होत असते. शहरामध्ये तसेच जिल्ह्यात कुठेही काही घडले की या मोठया बंदोबस्तासाठी गाड्या जात असतात. मात्र या शहर जेलच्या शेजारील नाल्यावरील लोखंडी जाळी तुटल्याने ही वाहतुक आता अडचणीची झाली आहे. यातुन देखील मार्ग काढत धोकादायकरित्या वाहतुक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरात या धोकादायक तुटलेल्या जाळीच्या बाजूने दगडे लावण्यात आली आहेत. सातारा बांधकाम विभागागडे सातारा शहरातील शासकिय कार्यालयांची दुरूस्ती देखभाल याची जबाबदारी आहे. मात्र ती पार पाडण्यामध्ये दुर्लक्ष झाल्याने सर्वसामान्यासह शासकिय आधिकारी कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागला आहे. सातारा शहर पोलीसस्टेशन व कारागृहा शेजारील रसत्याची दुरावस्था झाली होती. येथील नगरसेवक व पत्रकार यांच्या पाठपूराव्याने अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता चांगल्या पध्दतीने तयार करण्यात आला. या रस्त्यावरून पोलीस वसाहतीचे ड्रेनेज व सांडपाणी गटारामधून सोउण्यात आले आहे. पडणड आता त्यावरील लोखंडी जाळी दोन्ही बाजूकडील मोडली आहे. ती तातडीनं दुरूस्त करून पोलीस दादा व सातारकर प्रवासी यांची गैरसोय दूर करावी असे आवाहन नागरिकांनी केले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)