सांगवी पोलीसांचे अंधश्रध्देला खतपाणी

सांगवी पोलीसांचे अंधश्रध्देला खतपाणी
पाच महिन्यानंतरही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
पुणे,दि.20(प्रतिनिधी)- अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सलग पाच महिने पाठ पुरावा करुनणी सांगवी पोलीस गुन्हा दाखल करुण घेण्यास टाळाटाळ करत आहेत. प्रार्थनाकरुन सर्व आजार बरे होतील असा दावा करणाऱ्या एका ख्रिश्‍चन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिसने केली आहे.
यासंदर्भात माहिती देताना अनिसच्या नंदिनी जाधव यांनी सांगितले, 10 ते 12 नोव्हेंबर दरम्यान ख्रिश्‍चन समाजाचा एक कार्यक्रम पीडब्यूडी मैदानावर पार पडला होता. यामध्ये अगदी ब्रेन ट्युमरपासून इतर गंभीर आजार प्रार्थनेने बरे करण्याचा दावा करण्यात आला होता. यासंदर्भात एका व्यक्तीने वैयक्तीकरीत्या सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता. परंतू तक्रार घेतली न गेल्याने त्याने अनिसशी संपर्क साधला. यानंतर आमच्या संघटनेचे कार्यकर्ते मागील पाच महिन्यापासून गुन्हा दाखल व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र त्याची कोणतीच गंभीर दखल घेतली गेली नाही. मंगळवारीही पोलीस उपायुक्तांशी फोनवर संपर्क साधल्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले नाही. पोलीस निरीक्षकाच्या मते या कार्यक्रमाची सीडी हिंदीत असल्याने त्याचे भाषांतर करावे लागणार आहे. मात्र भाषांतरकार मिळत नसल्याने आम्हाला काही करत येत नाही. हिंदीभाषा सर्वांना अवगत असल्याने एकतर त्याचे भाषांतर करायची गरज नाही. तसेच हिंदीचे मराठी भाषांतर करणारे सहजासहजी उपलब्ध होतात. यामुळे गुन्हा दाखल करुन न घेण्यासाठी हे कारण पुढे केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)