सांगवीत नदीपात्रात मृतदेह आढळला

पिंपरी – सांगवी येथे नदीपात्रात अज्ञात इसमाचा आज (गुरुवारी) सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह आढळला. पिंपरी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला असून इसमाची अद्याप ओळख पटली नाही.

मृतदेह आढळलेल्या इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. त्याची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने अग्निशमन दलास दिली.

-Ads-

मागील तीन दिवसांपूर्वी इसमाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तीन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढला. ही कामगिरी पिंपरी अग्निशमन दलाचे भूषण येवले, विठ्ठल सपकाळ, संतोष वारे यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)