सांगवीत गुरूवारपासून “पवनाथडी’

पिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तु, उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने 4 ते 8 जानेवारी दरम्यान पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. पवनाथडी जत्रेचे यंदा 12 वे वर्ष असून सांगवीतील पीडब्ल्युडी मैदानावर 4 ते 8 जानेवारी या कालावधीत जत्रा भरणार आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्या हस्ते या जत्रेचे उद्‌घाटन होणार आहे

दरम्यान, पवनाथडी जत्रेमध्ये शनिवार (दि. 5) सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता लावण्य दरबार हा लावण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच वाजता लिटील चॅम्स, सारेगमप कलाकार यांचा व सायंकाळी सात वाजता बॉलीवूड स्टार्स, हिंदी जुनी गीते, कव्वाली व गजल कार्यक्रम सादर होणार आहे. सोमवारी (दि. 7) सायंकाळी पाच वाजता धडाकेबाज सखी हा महिलांसाठी खास पैठणीचा कार्यक्रम व सायंकाळी सात वाजता गायन, वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होणार आहे. मंगळवारी (दि. 8) सायंकाळी पाच वाजता देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम; तर सायंकाळी सात वाजता कलाअविष्कार, मराठी चित्रपट गीते, भावगीते ह्या कार्यक्रमाने पवनाथडी जत्रेची सांगता होणार आहे. हे सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महिलांना विविध सुविधा पुरविण्याची मागणी
या पवनाथडी जत्रेमध्ये बहुतांश महिलांचा सहभाग असल्यामुळे महिला स्वच्छतागृहाची पुरेशी व्यवस्था असणे गरजेचे आहे. परंतु महिलांसाठी स्वच्छतागृह पुरेशी नसतात व असलेली स्वच्छतागृहे वेळोवेळी स्वच्छ केली जात नाहीत. त्यामुळे पवनाथडीमध्ये आलेल्या महिलांची कुचंबणा होते. तसेच पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था नसते त्यामुळे महिलांची छेडछाड, साखळी, पर्स हिसकावणे असे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळे सर्वसामान्य महिलांना आर्थिक भुर्दंड बसतो. तसेच वाटप केलेले स्टॉलही छोटे असतात. त्यामुळे सदर महिलांना त्यांचा व्यवसाय करण्याच्या दृष्टीने गैरसोईचे होते. त्यामुळे पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी महिलांसाठी पुरेसे व स्वच्छ स्वच्छतागृह, पुरेसे आकाराचे स्टॉल, महानगरपालिकेची सुरक्षा व पोलिस सुरक्षा तसेच आपत्कालिन परिस्थितीत तातडीची मदत म्हणून रुग्णवाहिका व अग्निशामक दलाचा बंब तैनात करावा, अशी मागणी साने यांनी केली आहे.

यात्रेसाठी 23 लाखांचा मंडप
पवनाथडी जत्रेसाठी मंडप व्यवस्था आणि इतर व्यवस्था पुरविण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदेची रक्कम 32 लाख 40 हजार रुपये होते. त्यासाठी चार निविदा प्राप्त झाल्या. शालीमार मंडप डेकोरटर्स, निकीता एसबीएस सहकारी संस्था, स्वामी समर्थ केटरर्स अँड डेकोरेटर्स आणि ओंकार ग्रुप यांचा त्यात समावेश आहे. यापैकी शालीमार मंडप डेकोरटर्स या ठेकेदाराची निविदा 30.5 टक्के कमी दराने आली. निविदा तुलनात्मकदृष्ट्‌या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार काम करण्यास सक्षम असल्याने शहर अभियंत्यांनी 31 डिसेंबर रोजी शालीमार मंडप डेकोरटर्स या ठेकेदाराची निविदा स्वीकारली आहे. त्यांच्याकडून 22 लाख 67 हजार रुपयांमध्ये काम करुन घेण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)