सांगवीतील “ब्लॅकमेलिंग’ प्रकरणात ट्‌विस्ट

पिंपरी – वेबसाईटवरून मैत्री झालेल्या महिलेने पैशांची मागणी करून बदनामी करण्याची धमकी दिली. वारंवार महिलेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर त्याने पोलीस ठाणे गाठले. मात्र, या घटनेमध्ये अचानक मोठा ट्‌विस्ट निर्माण झाला. या प्रकरणामध्ये चक्क बायकोचा मावस भाऊ सामील असल्याचे समोर आले आहे.

अभय विजयकुमार काटकर (वय-40, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरींद्रा उर्फ डॉली उर्फ आफरिन नजीर शेख (वय-27, रा. साईनगर, पिंपळे गुरव) आणि मयूर कांबळे (रा. साईनगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय यांची लोकेन्टो या वेबसाईटवरून डॉलीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. डॉलीने आणखी एका महिलेशी अभय यांची सना नावाच्या महिलेशी ओळख करुन दिली. त्या महिलेशी त्यांनी शरीरसंबंध ठेवले. यानंतर डॉलीने अभय यांना फोन करून आणखी पैसे देण्याची मागणी केली. त्यावर आणखी दीड हजार रुपये देण्यासाठी अभय तयार झाले. रविवारी (दि. 6) रात्री डॉलीने अभय यांच्या व्हॉट्‌स अपवर मेसेज करून 50 हजार रुपयांची मागणी केली. अभय यांनी 50 हजार रुपये न दिल्यास बायको आणि सासऱ्यांना सांगण्याची धमकी दिली.

अभय यांनी पत्नी, सासरे आणि इतर सदस्यांना विश्‍वासात घेवून हे प्रकरण त्यांच्या कानावर घातले. अभय यांच्या सासऱ्यांनी याबाबत पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला. सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या महिलेला पकडले. तिला पोलिसी खाक्‍या दाखविला असता तिने मयूर कांबळे याच्या साथीने बदनामीचा हा कट रचल्याचे उघड झाले. मयूर आणि डॉली हे लिव्ह इन मध्ये राहतात. डॉलीच्या मोबाईलमध्ये अभयचा फोटो पाहिल्यानंतर मयूरने हा आपला मेहुणा असून त्याच्याकडील पैसे उकळण्यासाठी आपण याला ब्लॅकमेल करू असा प्लॅन मयूरने केला होता. मात्र घरच्यांनी अभयला पाठिंबा दिल्याने हा प्लॅन फसला.

घर मालकाला समन्स
डॉली आणि मयूर यांना अटक करण्यात आली असून, आज (दि. 10) त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. दरम्यान, डॉली आणि मयूर हे एकाच फ्लॅटमध्ये “लिव्ह इन’मध्ये राहत होते. त्यांनी आपण पती-पत्नी असल्याचे सांगून भाडेतत्त्वावर हा फ्लॅट घेतला होता. घर मालकाकडे या दोघांची कोणतीही ठोस माहिती, कागदपत्र तसेच करारानामा देखील नव्हता त्यामुळे घर मालकालाही समन्स बजाविण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत पाटील यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)