सांगवीतील खुनाचा उलगडा

पिंपरी – सांगवी मधील कामगार वसाहतीजवळ एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 31) पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणावरून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.

अनिल महावीर खडिया (वय-26, रा. कामगार वसाहत, सांगवी. मूळ रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अजित नंदकुमार भोईया (वय-28, रा. कामगार वसाहत, सांगवी. मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार वसाहतीजवळ मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास खून झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सांगवी पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. प्रथमदर्शी खून झालेल्या व्यक्तीची तसेच खुनाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अत्यंत शिताफीने तपास करून आरोपीला अटक केली.

अनिल आणि अजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून त्याने अजित याच्या डोक्‍यात दगड घालून तसेच त्याच्यावर वार करून खून केला असल्याचे अनिल याने मान्य केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)