सांगली : संपादक दत्तकुमार खंडागळे यांना धमकावणाऱ्या गुंडावर कारवाईची मागणी 

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाची मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी 

सांगली : साप्ताहिक वज्रधारीचे संपादक व ख्यातनाम ब्लॉग रायटर दत्तकुमार खंडागळे यांना वारंवार फोन वरून धमकावणे व शिवीगाळ केली जात आहे. याचा गंभीर परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. याचा निषेध करत दत्तकुमार खंडागळे यांना धमकावणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करावे, अशी मागणी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांना देण्यात आले.

यावेळी तहसीलदार रंजना उबरहंडे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गणेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अतुल जाधव कडेगाव तालुका अध्यक्ष विनायक विभुते, कोल्हापुर येथील जेष्ठ पत्रकार सरदार करले, विनायक पवार, साप्ताहिक वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे, राजेंद्र काळे, रामदास साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत गायकवाड व दत्तात्रय सपकाळ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)