सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव मनपासाठी आज मतदान

मुंबई : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (1 ऑगस्ट) मतदान होणार आहे. दोन्ही महानगरपालिकेच्या एकूण 153 जागांसाठी 754 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सांगली- मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेसाठी उद्या सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शुक्रवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.
महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही ठिकाणी एकूण सात लाख 89 हजार 251 मतदार आहेत. त्यासाठी 1013 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आवश्‍यक तेवढी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार 792 अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)