सांगली महापालिकेचा आज फैसला

संग्रहित छायाचित्र

सरासरी 65 टक्के मतदान
सांगली – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि राजकीयदृष्ट्‌या प्रतिष्ठेच्या बनलेल्या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी विक्रमी मतदानाची नोंद झाली. यंदा निवडणूक लढवणाऱ्या 451 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले असून सरासरी 65 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे सांगलीकरांनी कोणाला आपला कौल दिला आहे हे आज शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.

मनपा तसेच निवडणूक प्रशासनाच्या जनजागृतीमुळे यंदा मताचा टक्का वाढला असून काही किरकोळ अपवाद वगळता महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. यंदा नवमतदारांनी “मतदान फस्ट’ म्हणत आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी सांगलीचे लोकप्रिय आणि कर्तृत्वान जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी सपत्नीक तसेच जिपचे सीईओ अभिजित राऊत यांनीही मतदान केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मिरजेच्या एका मतदान केंद्रावर 95 वर्षीय वृद्धाने आपला हक्क बजावला. त्यामुळे सांगली महापालिकेच्या नव्या सभागृहाचे सदस्य ठरवण्यासाठी सर्वच प्रभाग चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. त्यामुळे सांगली महापालिकेची निवडणूक ही लक्षवेधी ठरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)