सांगली, जळगाव महापालिकेत सत्तांतर

भाजपचे निर्विवाद वर्चस्व : शिवसेनेसह आघाडीला जोरदार दणका


जळगावात सुरेश जैन गटाचे वर्चस्व संपुष्टात

जळगाव/सांगली – राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी आदी मुद्‌द्‌यांवरुन भाजपविरोधी वातावरण असतानाही जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाडा महापालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागले आहेत.

जळगाव महापालिकेत भाजपने 75 पैकी 57 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवत सुरेश जैन यांची सद्दी संपुष्टात आणली. तर सांगली महापालिकेत एकूण 78 जागांपैकी भाजपने 41 जागांवर विजय मिळवला आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला 35 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जळगाव महापालिकेत तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचे वर्चस्व संपले आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागा मिळवता आल्या. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्लात गिरीश महाजन यांची जादू चालली आहे. पण वर्षभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी महापालिका कर्जमुक्त करण्याचे आणि जळगाव स्वच्छ सुंदर करण्याचें आव्हानही गिरीश महाजन यांना पेलावे लागेल.

आत्मचिंतन करु : सुरेश जैन
सुरेश जैनांनी आयुष्यभर आक्रमक राजकारण केले. अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर जैन यांनी त्यांनाही कोर्टात खेचले. मात्र भाजपकडून दारुण पराभव झाल्यानंतरही आज सुरेश जैन फार काही बोलले नाहीत. पराभव मान्य असून आत्मचिंतन करु, अशी प्रतिक्रिया सुरेश जैन यांनी दिली.

एकनाथ खडसेंना चेक
उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे यांचा शब्द चालायचा. जळगावात तर त्यांच्याशिवाय पानही हालत नव्हते. पण खडसे यांचे मुख्यमंत्र्यांशी बिनसले. त्यानंतर फडणवीसांनी गिरीश महाजनांना ताकद दिली आणि जळगावच्या विजयाच्या रुपाने हा एकनाथ खडसे यांना दिलेला मोठा चेक मानला जात आहे. भाजपची महापालिकेची टॅली दोनने वाढली आणि ही बाब मुख्यमंत्र्यांचा आणि भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढवणारी आहे.

सांगली महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप – 41
कॉग्रेस – 15
राष्ट्रवादी – 20
स्वाभिमानी आघाडी – 1
अपक्ष – 1
एकूण – 78

जळगाव महापालिका पक्षनिहाय आकडेवारी
भाजप – 57
शिवसेना – 15
एमआयएम – 3
एकूण – 75


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)