सांगली : कृष्णा नदी पात्रात मगरीने ओढून नेलेल्या मुलाचा शोध सुरु

सांगली : कृष्णा नदीच्या पात्रात मगरीने ओढून नेलेल्या 14 वर्षीय मुलाच्या शोधमोहीमेला आज पहाटेपासून पुन्हा सुरुवात झाली. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास काही मुलं पोहत असताना, अचानक एका मगरीने सागर डंक नावाच्या मुलावर हल्ला करत त्याला पाण्यात ओढून नेले.

दरम्यान, मगरीच्या हल्ल्यानंतर आरडाओरडा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी नदीकाठी धाव घेतली. परंतु तोपर्यंत मगर त्याला पाण्यात घेऊन गेली होती. शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती, पण त्यात यश आलं नाही. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटेपासून पुन्हा  शोध सुरु केला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)