सांगलीतील पराभवाचे आत्मपरीक्षण करणार – हर्षवर्धन पाटील

कोल्हापूर – सांगली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा झालेला पराभव आघाडीच्या नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. गेल्या तीस वर्षांत कधी न झालेला सांगली महापालिकेतील सत्ता बदलाबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता आत्मपरीक्षण करणार असल्याची माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

मराठा आरक्षणाबाबत राज्यभर सुरू असणाऱ्या आंदोलनाला कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयाची आताच्या सरकारने अंमलबजावणी करावी म्हणजे मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळू शकेल, असे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील साखर कारखानदारीही सध्या अनेक अडचणींना सामोर जात आहे. साखर कारखानदारीचे भविष्य पाहता केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवण्याची गरज असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील साखर कारखाने हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

भाजपाला किंमत मोजावी लागेल
हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापुरात दसरा चौकात सुरू असणाऱ्या मराठा क्रांती ठोक आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच नऊ तारखेला होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनात आपण मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन त्याठिकाणी सहभाग नोंदवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजप सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी इच्छाशक्ती नाही. भाजप सरकारमधील मंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणतेही शासकीय सोपस्कर पूर्ण करताना दिसत नाहीत. केवळ वेळकाढूपणा करतात. परंतु सरकारला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)