सांगलीच्या कमळाच्या पाकळ्या साताऱ्यात उमलणार ?

सातारा – सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत कमळ फुलले आहे. एकूण 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी मतदान झाले होते. त्याचा निकाल आज लागला. स्पष्ट बहुमत मिळवत भाजपाने सत्ता काबीज केली. या राजकीय यशाचा सातारा जिल्ह्यात कसा फायदा उठवता येईल याची मांडणी राजकीय विश्‍लेषकांकडून सुरू झाली आहे.एकूण 41 जागा मिळवत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका आणि जळगाव महापालिकेसाठी बुधवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यानंतर शुक्रवारी मतमोजणी सुरू होती. सकाळी 10 वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू होती. काही वेळापूर्वीच मतमोजणी पूर्ण झाली आहे. ज्यानंतर सांगली महापालिकेत कमळ फुलल्याचे स्पष्ट झाले आहे .सांगलीच्या या यशाचे सातारा ,कराड व खंडाळा येथील तालुका कार्यकारिणीच्या वतीने एकमेकांना साखर वाटून जल्लोष करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रुजणारी पाळेमुळे पाहता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे. मराठा क्रांती मोर्चामुळे भाजप राजकीय दृष्टया बॅकफूटवर असल्याच्या चर्चेला चांगलाच सेट बॅक बसला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पदवीधर मतदारसंघ तसेच विधानसभा मतदार संघ निहाय जिल्हयातील राजकीय बांधणीचे स्पष्ट संकेत जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिले आहेत. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मास्टर कार्ड कोल्हापूर जिल्ह्यात चालवायचे असल्यानेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांना राजकीय स्वातंत्र्य दिल्याची चर्चा आहे. कोअर कमिटीमध्ये सदाभाऊंसह शेखर चरेगावकर, अतुलभोसले आणि समतोल म्हणून साताऱ्यातून दीपक पवार यांना स्थान मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र अंर्तगत कुरघोड्यांनी साताऱ्याच्या होम ग्राउंडवर गोंधळाचे वातावरण आहे.

तर, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा आणि शिवसेना यांच्यात तिरंगी लढत पहायला मिळाली. तशीच विरोधाची समीकरणे साताऱ्यात आहेत. शिवसेनेच्या एका गटाने नितीन बानगुडे-पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. पण भाजपकडे असा प्रभावी असा मि.क्‍लीन नसल्याने सवयीप्रमाणे खासदार उदयनराजे यांच्या वळचणीला जाण्याचा पूर्वानुभव आणि त्याची अंमलबजावणी राजकीय दृष्टया अडचणीची आहे.

सांगली महापालिकेचे यश म्हणजे भाजपा स्वबळावर उभा राहतोय हा स्पष्ट संदेश आहे. त्यामुळे सातारा जिल्हयातही स्वबळावर उभी राहण्याची ताकद कार्यकर्त्यांना द्यावी लागणार आहे सांगलीत सुरूवातीला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी घेतली होती. मात्र भाजपाने मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा राज्यातले इतर प्रश्न असतील. त्यावरून या दोन्ही निवडणुकांमध्ये काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. जळगावमध्ये सुरेश जैन यांना धक्का देत भाजपाने सत्ता काबीज केली. त्यानंतर आता सांगलीतही भाजपानेच सत्ता राखली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बुरे दिन सुरू झाले का? अशी चर्चा रंगली असतानाच दोन्ही महापालिकेत कमळ फुलले असल्याने भाजपाची जादू कायम आहे असेच दिसते आहे. या जादूचा करिष्मा साताऱ्यातकमळाच्या रूपाने दिसावा ही अपेक्षा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)