रहिमतपूर – जिल्हयातील इतर साखर कारखाने महिन्यापूर्वीच बंद झाले असले तरीही कार्यक्षेत्रातील ऊस संपवायचाय निश्‍चय केलेल्या सहयाद्री व्यवस्थापनाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयापर्यंत ऊस तोडणी सुरू ठेवून कार्यक्षेत्रातील सर्वच ऊस संपवला आहे.

सह्याद्रीच्या कर्मचाऱ्यांबरोबर ऊस तोडणी कामगारांनीही ऐन मे महिन्याचे ऊन डोक्‍यावर घेत ऊस तोडण्याची पराकाष्ठा केली. घरी जाण्याचे वेध लागलेल्या तोडणी कामगारांना ऊस संपवल्याशिवाय जाता येत नव्हते. अखेर रहिमतपूर व वाठारकिरोली गटातील ऊस संपल्यानंतर ऊस वाहनचालक व ऊस तोड कर्मचारी यांनी वाठार किरोली येथे ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळणीत उत्साहात शेवटच्या वाहनांना निरोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)