“सह्याद्री’कडून ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

राजगुरूनगर- कान्हेवाडी (ता. खेड) येथील सह्याद्री प्रतिष्ठान, सह्याद्री ज्येष्ठ नागरिक संघ व राजगुरूनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मणिलाल काका नाईकडे यांना सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. चैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी क्रांती शेतकरी संघाचे अध्यक्ष अमोल तुपे होते. राजगुरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, जिल्हापरिषद सदस्या तनुजा, घनवट, पं. स. सदस्य अंकुश राक्षे, माजी सदस्य बापुसाहेब घाटकर, ऍड. गिरीश कोबल, अभियंता शांताराम कोबल, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल, नागरिक संघाचे अध्यक्ष बाजीराव कोबल, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोबल, ग्रामपंचायत सदस्य जयवंत निमसे, दत्तात्रय आंबेकर, निवृत्त पोलीस अधिकारी पांडुरंग सहाणे, अशोक कोबल, रविंद्र कोबल, विजय गदो, पोलीस पाटील श्‍याम आंबेकर, दिलीप मांजरे, प्रवीण मांजरे, झांबर केदारी, आनंदराव कोबल यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. मेळाव्याचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सकाळी चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौरी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, तुकाराम गाथा व शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. चैतन्य हास्य योग परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी मार्गर्शन केले. अध्यक्ष कृष्णकांत कोबल यांनी प्रास्तविक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)