‘सह्याद्रि’वर साखर पोत्यांचे पूजन

कराड, दि. 24 (प्रतिनिधी) -सह्याद्रि साखर कारखान्याच्या यावर्षीच्या गळीत हंगामातील उत्पादित झालेल्या 1 लाख 85 हजार 110 वरील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन चेअरमन आ. बाळासाहेब पाटील व संचालकांच्या उपस्थितीत झाले.
याप्रसंगी आ. पाटील म्हणाले, कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेस पुरेल अशाप्रकारे ऊसाची आवक होत आहे. प्रतिदिन 8200 मे. टनाचेवर म्हणजेच दैनंदिन गाळप क्षमतेच्यावर ऊस गाळप सुरू आहे. या हंगामात 23 दिवसांत 1,71,900 मे. टन उसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा 11.01 टक्के मिळाला आहे. 1,85,110 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आलेले आहे.
साखर पोती पूजन समारंभासाठी मानसिंगराव जगदाळे, अशोकराव पाटील-पार्लेकर, सुरेशराव माने, कांतीलाल पाटील, संजय जगदाळे, रमेश मोहिते, माणिकराव पाटील, पांडुरंग ज्ञानदेव पाटील, पै. संजय थोरात, तानाजी जाधव, जयवंतराव जाधव, भास्कर गोरे, नंदकुमार माने, डी. बी. जाधव, अविनाश माने, महादेव वाघमारे, लहु जाधव, आबासाहेब पाटील, पी. आर. यादव, एच. टी. देसाई, जी. व्ही. पिसाळ, वाय. जे. खंडागळे, बी. एस. शिंदे, एम. ए. पाटील उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)