सह्याद्रिच्या वजनकाट्याची वैधमापनकडून तपासणी

वजनकाटे अचूक असल्याची निवासी नायब तहसीलदारांची माहिती

मसूर – यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्रि साखर कारखान्याच्या इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यांची तपासणी निवासी नायब तहसिलदार अजित कुऱ्हाडे यांनी मंगळवारी केली. त्यांच्यासोबत वैधमापन शास्त्राचे सहाय्यक नियंत्रक आर. एन. गायकवाड, ल. उ. कुटे, पुरवठा निरीक्षक गोपाल वसू, गोवारे, सैदापूर व पार्ले आदी गावातील शेतकरी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. तपासणीमध्ये शेतकरी संघटना व शासन यांच्या पथकाने सह्याद्रिचे वजनकाटे अचूक असल्याचे सांगितले.

सह्याद्रि कारखान्याकडे गळीतासाठी येणाऱ्या उसाचे भर व रिकामे वजन करण्यासाठी एकूण 4 अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक वजन काटे आहेत. तपासणीवेळी कारखान्यावर गळीतासाठी ऊस घेवून आलेल्या बैलगाडी व ट्रॅक्‍टर अशा एकूण 3 उसाने भरलेल्या वाहनांचे अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करण्यात आले. 20 कि.ग्रॅ. क्षमतेच्या एकूण 7080 कि.ग्रॅ. प्रमाणित वजनाने सर्व इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यांच्या अचूकतेसाठी तपासणी करण्यात आली. प्रत्येक इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्याच्या बाहेरील बाजूस ऊस उत्पादक व वाहन धारकास दिसण्यासाठी जंबो डिस्प्ले बसवण्यात आले.

तपासणीवेळी उसाने भरलेल्या गाड्यांचे वजन करून गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या पथकातील प्रतिनिधींनीकडून परत इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर फेरवजन करण्यासाठी बोलावण्यात आल्या. त्या वाहनांचे फेरवजन करून निरीक्षणे नोंदवण्यात आली. या पथकाने विविध निकषांच्या आधारे तपासणी केली व कारखान्यातील ऊस वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले. शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी सुनिल कोळी, विश्‍वास जाधव, गणेश शेवाळे, विजय पाटील, पी. आर. यादव, पी. एस. सोनवणे, पी. एस. कुंभार, बी. डी. नलवडे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)