मसूर – यशवंतनगर, ता. कराड येथील सह्याद्रि साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत-जास्त ऊस उत्पादक सभासदांना सुधारित शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत-जास्त उत्पादन घ्यावे. यासाठी कारखान्याच्या वतीने दरवर्षी पुरुष शेतकऱ्यांना ऊस शेती ज्ञानयाग व महिला शेतकऱ्यांना ऊस शेती ज्ञानलक्ष्मी शिबीरासाठी मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. त्यानुसार पाच दिवसांच्या कालावधीसाठी मंगळवारी कारखान्याचे 23 ऊस उत्पादक शेतकरी ज्ञानयाग कार्यक्रमासाठी रवाना झाले.
यामध्ये रामचंद्र काटकर (रहाटणी), जनार्दन कदम (पेरले), मोहन निकम (इंदोली), धोंडीराम बर्गे (अंधारवाडी), कृष्णत मोहिते (तळबीड), नवनाथ माने (गमेवाडी), पांडुरंग बाबर (डेळेवाडी), प्रदीप पवार (वडोली नि.), शिवाजी पवार (वडोली नि.), भिमराव चव्हाण (कोणेगांव), संतोष देशमुख (मसूर), सागर जगदाळे (मसूर), धीरज जाधव (मसूर), धनाजी चव्हाण (किरोली), विजय जाधव (पिंपरी), शरद पवार (बलवडी), भागवत मोरे (देवराष्ट्रे), पृथ्वीराज भांदीर्गे (कोपर्डे काशीळ), भगवान पवार (बेलवडे हवेली), अनिरुध्द कुचेकर (वेणेगांव), शंकर पिसाळ (चोराडे), शहाजी पवार (शिरवडे) व शुभम निगडे (अंधारवाडी) यांचा समावेश आहे.
प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्व खर्चाची व्यवस्था कारखान्याच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, एच. टी. देसाई, जी. व्ही. पिसाळ, एम. ए. पाटील, जे. डी. घार्गे, ऊस विकास अधिकारी व्ही. बी. चव्हाण, एस. जी. चव्हाण उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा