सहिष्णू देशांच्या यादीत भारताचा चौथा क्रमांक

नवी दिल्ली – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार सहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून कॅनडाने पहिला नंबर पटकावला आहे. एका संस्थेद्वारे सहिष्णू देशांचा सर्व्हे करण्यात आला होता.यावेळी जगातील २७ देशांतील एकूण २० हजार लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

वेगवेगळे बॅकग्राऊंडस, संस्कृती आणि दृष्टिकोण असणाऱ्या ६३ टक्के लोकांनी भारत सहिष्णू असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे. यात भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. समाजात दरी निर्माण करणाऱ्या तथ्यांना प्रकाशात आणण्याचा या मुलाखतीतून प्रयत्न करण्यात आला आहे. सहिष्णू देशांच्या या यादीत कॅनडाने प्रथम स्थान पटकावलं असून चीन आणि मलेशियाने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)