सहा हजार कोटी ते २४ लाख कोटी ! (भाग-१)

म्युच्युअल फंड क्षेत्राची ५५ वर्षांची लक्षणीय वाटचाल

१९६३ साली भारतात सरकारच्या पुढाकारने सुरु झालेला पहिला म्युच्युअल फंड म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया. भारत सरकार व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी पुढाकार घेऊन या म्युच्युअल फंड कंपनीची मुहुर्तमेढ रोवली. म्युच्युअल फंड क्षेत्राचा इतिहास प्रामुख्याने चार विविध टप्प्यात विभागला आहे.

पहिला टप्पा (१९६३ ते १९७७) – युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचा जन्म १९६३ साली झाला. यासाठी संसदेत कायदा करून याची निर्मिती झाली. युटीआयने आपली प्रथम योजना युनिटस् स्कीम १९६४ (यूएस-६४) बाजारात आणली. या कंपनीच्या कामकाजावर तसेच यासाठी निर्माण केलेल्या नियमांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा संपूर्ण पगडा होता. १९७८ साली युटीआयचे नियंत्रण आरबीआयने सोडले आणि याचा काळात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (आयडीबीआय) ने यूटीआयने आपले नियंत्रण प्रस्थापित केले. १९८८ च्या शेवटी यूटीआयजवळ सहा हजार ७०० कोटींची गुंतवणूक जमा झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरा टप्पा (१९८७-९३) – या काळात सार्वजनिक क्षेत्रातील म्युच्युअल फंड कंपन्यांचा उदय झाला. १९८७ हे वर्ष युटीआय व्यतिरिक्त इतर म्युच्युअल फंड कंपन्यांच्या उदयाचे वर्षे ठरले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी – जून १९८९) , जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआयसी – डिसेंबर १९९०) या कंपन्या सुरु झाल्या. एसबीआय म्युच्युअल फंड ही पहिली म्युच्युअल फंड कंपनी जून १९८७ रोजी निर्माण झाली. यूटीआयनंतर अस्तित्वात आलेली ही दुसरी कंपनी ठरली. यानंतरच्या काळात कॅनरा बँकेने म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश (डिसेंबर १९८७) केला. पंजाब नॅशनल बँक म्युच्युअल फंड (ऑगस्ट १९८९), इंडियन बँक म्युच्युअल फंड (नोव्हेंबर १९८९), बँक ऑफ इंडिया म्युच्युअल फंड (जून १०९०), बँक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड (ऑक्टोबर १९९२) या व्यवसायात उतरल्या. १९९३ च्या शेवटी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये एकूण गुंतवणूक ४७,००४ कोटींपर्यंत वाढली.

तिसरा टप्पा (१९९३ ते २००३) – खासगी क्षेत्रातील म्युच्युअल फंडांचा उदय या काळात झाला. १९९३ साली प्रथमच खासगीक्षेत्रातील म्युच्युअल फंड कंपन्यांचा उदय झाला आणि जणू काही म्युच्युअल फंड क्षेत्रात नवीन पर्व सुरु झाले. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना एक मोठा व्यापक पर्याय मिळाला. १९९३ साली प्रथम म्युच्युअल फंडांसाठी विशिष्ट नियमावली ठरवण्यात आली आणि सदर नियमावलीतच सर्व म्युच्युअल फंडांचे कामकाज चालवले जाऊ लागले. यातून यूटीआयला मात्र वगळ्यात आले होते.

–    नोव्हेंबर २०१८ अखेरीस

–    ४३ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अंतर्गत

–    रू. २४.०३ लाख कोटींची गुंतवणूक

–    पोर्टफोलिओची संख्या –७.९७ कोटी

जुलै १९९३ मध्ये कोठारी पायोनियर हा पहिला खासगी म्युच्युअल फंड व्यवसायात उतरला. १९९३ साली सेबीने (सिक्युरिटी एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया) ने केलेल्या नियमावलीमध्ये मोठा विस्तार करून नवीन व्यापक नियमावली १९९६ मध्ये तयार करण्यात आली.

सहा हजार कोटी ते २४ लाख कोटी ! (भाग-२)

यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातील तसेच परदेशी म्युच्युअल फंडांनी भारतात व्यवसाय करण्यास सुरवात केली. हाच काळ अनेक म्युच्युअल फंडांच्या विलीनकरणाचाही ठरला. याच काळात काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांवर ताबा मिळवला. जानेवारी २००३ अखेरीस ३३ म्युच्युअल फंड कंपन्यांच्या अखत्यारीत एकूण रू. एक लाख २१ हजार ८०५ कोटींच्या गुंतवणुकीच्या रकमा जमा झाल्या होत्या. २००३ अखेरीस  युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ४४ हजार ५४१ कोटींच्या गुंतवणुकीसह प्रथम क्रमांकावर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)